आता ट्रेनमध्ये किंवा स्टेशनच्या आवारात धूम्रपान करणे महागात पडेल ! नियम मोडल्याबद्दल होऊ शकेल तुरुंगवास आणि दंड, त्याविषयी जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपण नेहमीच ट्रेनने प्रवास करत असाल किंवा भविष्यात प्रवासाचा विचार करत असाल तर हे लक्षात असू द्या की, आता ट्रेनमध्ये किंवा स्टेशनच्या आवारात धूम्रपान करणे आपल्याला खूप महागात पडेल. भारतीय रेल्वे (Indian Railway) आता ट्रेनमध्ये धूम्रपान करणार्‍यांवर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. या योजनेंतर्गत, जर कोणी ट्रेनमध्ये धूम्रपान करताना पकडले गेले तर जबरदस्त दंडासह त्याला अटक देखील केली जाईल. धूम्रपान म्हणजेच बीडी आणि सिगारेट ओढत असतील त्यांना आता तुरूंगाची हवा खावी लागू शकते. भारतीय रेल्वे आता रेल्वेत धूम्रपान करणार्‍यांना आणि नियम मोडणाऱ्यांना शिक्षा देण्याच्या मनस्थितीत आहे. हे नियम तोडण्यावर रेल्वे मंत्रालय आता जोरदार दंड लावण्याची तयारी करत आहे.

या स्टेप मागील काय कारण आहे ते जाणून घ्या
13 मार्च रोजी नवी New Delhi-Dehradun Shatabdi Special train S5 मध्ये आग लागल्यानंतर रेल्वे मंत्रालय नियम अधिक कडक बनवणार आहे. रेल्वेला घटनास्थळी अनेक सिगारेटचे बटस सापडले असल्याचे अनेक अहवालात समोर आले आहे. असं म्हणतात की, ट्रेनच्या डस्टबिनमध्ये सिगारेट टाकल्यामुळे त्यात फेकलेल्या टिश्यू पेपरमध्ये आग लागली, यामुळे रेल्वेमध्ये आग लागण्याची ही घटना घडली. यानंतर, रेल्वे मंत्रालयाने धूम्रपान करण्याबाबत काटेकोरपणे आदेश देण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या दंडाची रक्कम केवळ 100 रुपये आहे
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे आणि स्टेशन परिसरातील प्रवाशांचे धूम्रपान रोखण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी कृतीशील पावले उचलण्याचे आदेश दिले. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये धूम्रपान केल्याने अनेक प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये धूम्रपान करणे रेल्वे कायद्याच्या कलम 167 अंतर्गत गुन्हा आहे, परंतु यासाठी केवळ 100 रुपये दंड आहे. सरकार आता त्यात वाढ करण्याच्या विचारात आहे. त्याच वेळी सरकार या गुन्ह्यासाठी तुरूंगवासाची तरतूद देखील करू शकते. आता जर कोणी ट्रेनमध्ये धूम्रपान करताना पकडला गेला असेल तर त्याला जोरदार दंड होऊ शकतो.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment