Tuesday, January 31, 2023

म्हणुन त्यांनी भटक्या कुत्र्यांची पिल्ली आरोग्य विभागाला दिली भेट

- Advertisement -

सांगली |  महादेवनगर परिसरातील युवा शक्तीच्या युवकांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला भटक्या कुत्र्यांची भेट दिली. शहरातील व महादेवनगरातील भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्ताची अनेकदा मागणी करून दुर्लक्ष केल्याने आज युवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आरोग्य विभागाचे अनिकेत हेंद्रे यांना भटक्या कुत्र्यांची भेट दिली.

इस्लामपूर शहर व उपनगरांमध्ये वाढता भटक्या जनावरांमुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांच्यावर हिंसक कुत्र्यांचे हल्ले यामुळे जनता त्रस्त आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून इस्लामपूर नगरपालिका आरोग्य विभागाला अनेक वेळा निवेदने व वस्तुस्थितीचे फोटो दाखवून परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. पण ढिम्म अधिकारी व ठेकेदार यांचा निषेध म्हणून आज प्रतिकात्मक भटक्या कुत्र्यांची पिल्ली भेट देण्यात आली.

- Advertisement -

महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजीत थोरात, जेष्ठ नेते महादेव करे, मनसेचे सतीश पवार, संदिपराज पवार, अल्लाफ तहसीलदार, गौरव खेतमर उपस्थित होते. धीरज कबुरे, सुदाम चव्हाण, सोमनाथ जाधव, प्रथमेश निकम, मयुरेश शेजाळे, सागर जावळे, संकेत भंडारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भविष्यात या प्रश्र्नी दुर्लक्ष केले तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.