म्हणुन तिने हत्तीवर बसून शूट केला नग्न फोटोशूट; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियावर झळकण्याची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यातच आपला एखादा मेसेज जगाला पोहचता करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तो पोहचवला जातो. कोणी एखादी यात्रा काढते, कोणी चालत जाते तर कोणी नग्न होऊन निसर्गाला नैसर्गिक पद्धतीने वागवा असे सांगते. असाच एक व्हिडिओ आणि फोटो गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो म्हणजे रशियाची 22 वर्षीय तरुणीने एका हत्तीवर नग्न झोपून छायाचित्र आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

या 22 वर्षीय तरुणीचे नाव अलेस्या काफेलनिकोव असे आहे. ती जागतिक टेनिस क्रमावरीमध्ये अव्वल राहिलेल्या माजी टेनिसपटू येवगेनी काफेलनिकोव यांची कन्या आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘natural wibes’ या शिर्षकासह व्हिडिओ टाकला होता. पण काही वेळातच प्राणी प्रेमींनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर आणि टीका केल्यानंतर अलेस्या हिने व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट केला आहे.

व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तिने तो व्हिडिओ कढण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. ती म्हणते की, तिला हत्तीबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि त्यांना वाचवण्याची प्रबळ इच्छा आहे. त्यामुळे तिने तो व्हिडिओ काढला. सोबतच तिने स्थानिक लोकांना मदतही केली असल्याचे तिने सांगितले आहे. फोटोमध्ये सुमात्रन जातीचा हत्ती होता. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्जर्वेशन ऑफ नेचर (IUCN) ने सुमात्रन हत्तींना लुप्त होत असलेल्या प्राण्यांचा दर्जा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.