Tuesday, June 6, 2023

म्हणून ‘त्या’ डॉक्टर आणि नर्सने हॉस्पिटलमध्येच केले लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनाच्या या संकटकाळात मोठमोठे कार्यक्रम रद्द झाले आहेत. काहींचे लग्न ठरायचे राहिले आहे तर काहींचे ठरलेले लग्नच थांबले आहे. आणि अद्यापही पूर्णतः संचारबंदी हटण्याची लक्षणे दिसत नाहीत आहेत. त्यामुळे पुढचे काही महिने सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करण्यास संमती नसणार आहे. इतक्यात आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु होण्याच्या काहीच शक्यता नाहीत. त्यामुळे ऑगस्ट मध्ये ठरलेले लग्न आताच एका जोडप्याने उरकून टाकले आहे. लंडनमधील एका हॉस्पिटलमधील एक डॉक्टर आणि नर्स यांनी हॉस्पिटलमध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

३४ वर्षीय जैन टिपिंग आणि ३० वर्षीय अनालन नवरत्नम असे या जोडप्याचे नाव आहे. हे दोघेही ऑगस्टमध्ये विवाहबद्ध होणार होते. पण श्रीलंका आणि उत्तर आयर्लंडमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय लंडनमध्ये लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत. या भीतीमुळे त्यांनी हॉस्पिटलमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात त्यांनी लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयातच लग्न केले आहे. त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी या लग्नाला व्हर्च्युअली उपस्थिती लावली होती.

” सगळे ठणठणीत असताना आम्हाला लग्न करायचे होते, मग त्यांनी आम्हाला स्क्रिनवर पहिले तरी काही हरकत नाही” असे टिपिंग यांनी म्हण्टल्याचे हॉस्पिटलने त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून सांगितले आहे. २४ एप्रिल ला झालेल्या या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत. या फोटोना जवळपास २० हजार लोकांनी लाईक केले आहे तर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.