मग पुढील वर्षीच्या कुंभमेळ्याला सरकारनं परवानगी का दिली? : जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं.  असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “कुंभ मेळ्याचं आयोजन दर १२ वर्षांनंतर केलं जातं. यानुसार कुंभ मेळा २०२२ मध्ये आयोजित झाला पाहिजे होता. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारनं २०२१ मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्याची परवानगी कशी दिली? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कुंभमेळ्यात मृत्यू झालेल्यांची माहिती घेतली. त्यांनतर त्यांनी कुंभमेळ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. कुंभमेळ्यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे कुंभमेळा रद्द करण्याचीही मागणीही झाली. मात्र, त्याला कारणं देत नकार देण्यात आला. अखेर कुंभमेळ्यात करोनाचा प्रसार झाल्याने यात अनेकजण कोरोनाणे संक्रमीत झाले. त्यांनतर अनेक आखाड्यांनी कुंभमेळा समाप्त झाल्याची घोषणा केली. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रातिनिधिक स्वरूपात कुंभमेळा पार पडला.

You might also like