प्रत्येक कोरोना रुग्णामागे पालिकेला दीड लाख रुपये मिळत असल्याचा व्हायरल संदेश चुकीचा; केंद्राचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना काळात अनेक अफवांचा बाजार तेजीत असून केंद्र सरकारकडून कोरोनाशी निगडित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत आहे. मात्र तरीही सोशल मीडियात वारंवार अफवा पसरवल्या जात आहेत. दरम्यान, अशाच एका अफवेबाबत केंद्राकडून खुलासा करण्यात आला आहे. महापालिका आणि नगरपालिकांना प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असल्याचा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मात्र, हा संदेश चुकिचा असून त्यात काही तथ्य नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणा-या संदेशात म्हटले आहे की, प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च देण्यात येईल, असे नगरपालिका आणि महानगरपालिका असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, पॅथोलॅब आणि प्रायव्हेट डॉक्टर्स हे सर्व मिळून कोरोना रुग्णांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे.

सामान्य माणसाला ताप किंवा खोकला झाला की त्याला कोरोना पॉझिटीव्ह घोषित करत आहेत. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीमागे दीड लाख कमवता येतील. केंद्र सरकार कडून हा प्लॅन सध्या पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सुरू झाला आहे. कोरोना हा आता कोणताही आजार राहिलेला नसून तो आता मेडिकल इंडस्ट्रीचा धंदा झाला आहे, असा संदेश व्हायरल होत आहे. दरम्यान, सरकारने हा संदेश खोटा असल्याचे सांगितले असून त्यात कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. लोकांनी या संदेशावर अजिबात विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment