महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकाला मिळाला ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला. हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली.

असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.

मी सोलापूर जिल्ह्यात असतांना, पुरस्कारांची घोषणा झाली. आपल्याला पुरस्कार जाहीर झाल्याचे कळाल्यावर खूप आनंद झाला आणि समाधान वाटले. या पुरस्कारासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, वार्की फाउंडेशन आणि शालेय शिक्षण विभागाचे आभार मानतो. हा पुरस्कार मी राज्य व देशातील माझ्या शिक्षक बांधवांना समर्पित करतो. पुरस्काराची निम्मी रक्कम ९ शिक्षकांना त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी देण्यात येईल. तर, शिक्षकांना टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी ३० टक्के रक्कम वापरण्यात येईल. अशी प्रतिक्रिया रणजितसिंह डिसले यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment