पर्यटकाच्या कॅमेऱ्यासोबत वाघीणीने केले ‘असे’ काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी |वाघीणीने आपल्या बछड्या सोबत येवून गाडीतून खाली पडलेला कामेरा तोडून तुकडे तुकडे केल्याची घटना ताडोबा अभयारंण्यात घडली आहे.

सोमवारी सकाळी त्यांचा कॅमेरा जिप्सीतून खाली पडला तेव्हा छोटी तारा अवघ्या 10 मीटर अंतरावर होती. रस्तोगी कधी कॅमेऱ्याकडे तर कधी वाघिणीकडे बघत होते. दरम्यान, त्याच वेळी ताराने कॅमेऱ्यावर झडप टाकली. वाघीण व तिचे दोन बछडे काही वेळ कॅमेरा न्याहाळत होते. त्यानंतर त्यांनी कॅमेरा उचलून नेला आणि खेळत बसले. वाघीण आणि तिच्या बछड्यांनी या खेळात कॅमेऱ्याचे एकेक भाग वेगळे केले. लेन्स पूर्णपणे वेगळ्या झाल्या. त्यानंतर दोन्ही लेन्स वाघिणीने तोडून टाकल्या.

अत्यंत दुर्मिळ असलेल्या ब्लॅक पँथरपासून छोटी तारा व तिचे कुटुंबही पर्यटकांना दर्शन देत आहेत. वन्यजीव छायाचित्रकार अरुण रस्तोगी आठवडाभरापासून ताडोबात मुक्कामी आहेत. या सफारीत त्यांनी 8 वाघ पाहिले आहेत.चंद्रपूरातील जग प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव छायाचित्रकार अरुण रस्तोगी सोमवारी जंगल सफारी करत होते. त्यावेळी त्यांच्या हातातील कॅमेरा अचानक जिप्सीच्या खाली पडला. कॅमेरा उचलण्यापूर्वीच अवघ्या दहा मीटर अंतरावरील छोटी तारा या वाघिणीने त्यावर झडप घालून कॅमेरा आणि लेन्स तोडली. सुट्टीमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची तुफान गर्दी आहे. उन्हाचा पारा हा 47.2 ते 45 सेल्सिअसमध्ये आहे. त्यामुळे वाघ आणि अन्य वन्यजीव पाणवठ्यावर गर्दी करतात. पाठवठ्यावर होणाऱ्या गर्दीमुळं पर्यटकांना देखील वन्य जीव प्राण्यांचे दर्शन होत आहे.

Leave a Comment