सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
अनेक गडकिल्ले सर करणारे ट्रेकिंग स्टार सोमनाथ शिंदे यांचे आज दुर्दैवी निधन झालं आहे. आज दिनांक ११/१२/२०२२ रोजी तैला बैला हा ट्रेक करताना दोर लावून खाली येत असताना अचानकपणे दोर तुटल्याने ते तब्बल २०० फुटांवरून कोसळले आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
खरे तर सोमनाथ शिंदे हे एक अस व्यक्तीमत्व होत ज्यांनी क्लाईमींग रॅपलिंग ट्रेक करत फक्त येण्या जाण्याच गाडीभाड घेऊन अनेकांना सह्याद्रीची ओळख करुन दिली. ज्यांना ट्रेक करायची इच्छा असते पण पैश्याच्या अभावी आपली इच्छा मारावी लागते अश्या शेकडो- हजारो ट्रेकर्स ना ट्रेक ला घेऊन जाऊन त्यांची इच्छा पुर्ण केली, अश्यांच हक्काच व्यासपीठ म्हणजे सोमनाथ शिंदे. एवढच नाही एखाद्याने ट्रेक अरेंज केला त्यात त्याना सोमनाथ शिंदे यांची मदत लागत असली तर कोणत्याही प्रकारे मांधन अथवा पैसे घेतले नाहीत. स्वखर्चाने मदत करणारा असा हा निस्वार्थि विचारांचा शिवशंभु छत्रपतींचा मावळा आज काळाच्या पडद्याआड गेला.
सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर पासुन जवळच त्यांच गाव आहे. कधीच कोणा बद्दल वाईट न बोलणारा वाईट विचार न करणारा निखळ, निर्मळ, स्वच्छ मनाचा तरुण म्हणून त्यांची मित्र परिवारात ओळख होती. सोमनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जगले. या सोमनाथ शिंदेचा शेवट हि या सह्याद्रीच्या कुशीतच होईल. मराठ्याची आवलाद आहे मरणाला भेत नाही. आपला सह्याद्रीच आपल सर्वस्व आहे. त्याच्या कुशीत मरण आल तर भाग्यवंत असेल मी हे त्यांचं एकेकाळचे वाक्य आज दुर्दैवाने खरे ठरले असेच म्हणावं लागेल.