माण तालुक्याच्या सुपुत्राला राजस्थानात देशसेवा बजावताना वीरमरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यातील माण तालुक्यातील संभूखेड गावचे सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय – 24) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा बजावताना मृत्यू झाला आहे. आज शनिवार दि. 23 संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सचिन काटे याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून दहिवडी कॉलेज दहिवडी येथे शिक्षण घेत असतानाच सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण स्वराज ॲकॅडमी दहिवडी येथे घेतले. अतिशय चपळ, एक ऊर्जावान तरुण, तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू, फुटबॉल, कबड्डी खेळाडू म्हणून त्याची ओळख होती.

2016 मध्ये तो सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर त्याचा भाऊही सैन्यात भरती झाला. गावी घराचे काम सुरू असून, त्यानंतर लग्न करण्याचे त्याचे स्वप्न होते; पण हे स्वप्न अपूर्णच राहिले. फक्त पाच वर्षांची देशसेवा झाली असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिनच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

Leave a Comment