‘इंडियन आयडॉल १२’च्या वादात आता सोनू निगची एन्ट्री; अमित कुमारांचे केले समर्थन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी टीव्हीवर ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रिऍलिटी शो कधीकाळी एक लोकप्रिय शो होता. पण त्यातील स्पर्धकांच्या सादरीकरण आणि गायन कौशल्यासाठी. तसा हा शो आजही लोकप्रिय आहे, मात्र अनेक वादविवादांसाठी. अलीकडेच इंडियन आयडॉल १२ चे मेकर्स, होस्ट आदित्य नारायण यांची किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार यांच्यासह चांगलीच जुंपली होती. आता या वादात बॉलिवूडचा गायक सोनू निगमने उडी घेतली आहे. सोनूने अमित कुमार यांची बाजू घेत, शोचा होस्ट आदित्य नारायण व गीतकार मनोज मुंतशीर यांना लक्ष्य केले आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘इंडियन आयडल व अमित कुमार यांच्यासंदर्भाने एक संदेश,’ या कॅप्शनसह सोनूने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/tv/CPk6eOBBD2B/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओत सोनू म्हणतोय कि, ‘इंडियन आयडॉल १२ वरून गेल्या काही दिवसांपासून अनेक वाद सुरू आहे. मी यावर शांत होतो, पण आता मला वाटतंय की, मी यावर बोलायला हवे. अमित कुमार यांना कोण ओळखत नाही, खूप महान व्यक्तिमत्त्व, किशोर कुमार यांचे चिरंजीव. माझ्या मते, अमित कुमार यांच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले गेले. अमित कुमार खूप साधे व सभ्य व्यक्ति आहेत. ते काहीही बोलत नाहीत, म्हणून तुम्ही लोक त्याचा फायदा घेत आहेत. मी शोच्या टीमला सांगू इच्छितो की, त्यांनी या वादाचा निकाल काढावा. ना इंडियन आयडॉलची चूक आहे, ना अमितजींची चूक आहे. यात चूक आहे ती या वादात उडी घेणा-या लोकांची आहे. मनोज मुंतशीर व आदित्य यासारख्यांची. अमित कुमार खूप सीनअर आहेत आणि आपल्या इंडस्ट्रीत सीनिअर व्यक्तींचा आदर केला जातो.’ असे म्हणत सोनूने आदित्य आणि मनोज यांना चांगलेच सुनावले आहे.

 

लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल १२’च्या ‘किशोर कुमार एपिसोड’मध्ये हजेरी लावली होती. परंतु, या भागावर प्रेक्षकांनी अनेक टीका केल्या. यानंतर अमित यांनीही शोबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. स्पर्धकांनी किशोर कुमार यांना आदरांजली वाहिली होती. परंतु, हा भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. या पार्श्वभूमीवर अमित यांनीही कार्यक्रमाचा हा भाग आवडला नसल्याचे म्हटले होते.

https://www.instagram.com/tv/CPH3t-hqY-s/?utm_source=ig_web_copy_link

‘मला सांगण्यात आले की सगळ्यांचे कौतुक करायचे आहे. मग ते कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे. कारण हा भाग किशोर कुमार यांच्या गाण्यांवर असणार आहे आणि मला याचेच पैसे मिळाले, म्हणून मी तेच केलं जे मला करण्यासाठी सांगण्यात आले, असे एका मुलाखतीत अमित कुमार म्हणाले होते. त्यानंतर शोचा होस्ट आदित्य नारायणाचे एकदा नव्हे तर दोनदा अमितजींबाबत बोलताना शाब्दिक स्थैर्य ढासळले होते. यावरून तो ट्रोलही झाला होता. तर यानंतर गीतकार मनोज मुंतशीर यांनीही अमितजींवर निशाणा साधला होता.

Leave a Comment