सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका ; हॉस्पिटलमध्ये दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीवर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

सौरवं गांगुली हा आक्रमक भारतीय कर्णधार म्हणून ओळखला जातो. भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस दाखवणारा कर्णधार म्हणून जगभरात सौरव गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.

BCCIचा अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीनं अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment