हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारत सोडून दक्षिण सिनेमा इंडस्ट्रीच्या सिनेमांचा मोठा प्रेक्षकवर्ग संपूर्ण भारतात तयार झाला आहे. टेलिव्हिजनपासून थिएटरपर्यंत दक्षिण सिनेमाचे हिंदी डब आवृत्तीच्या माध्यमातून दक्षिण भारतीय सिनेमे घराघरात पोहचले आहेत. नागार्जुन, चिरंजीवी, प्रभु देवा, अल्लू अर्जुन, महेश बाबू, रजनीकांत, प्रभास, धनुष यांसारख्या बड्या दाक्षिणात्यकलाकारांचा मोठा चाहतावर्ग आज देशभरात तयार झाला आहे. या सगळ्या दाक्षिणात्य सुपरस्टार एक अभिनेतासोबत काम करणारे नव्हे तर यांच्याशिवाय कुठलाही सिनेमा अपूर्ण वाटतो, जो आपल्या अभिनयातून खूप हसायला लावतो असा हा अभिनेता म्हणजे ब्रह्मानंदम. आज त्याचा ६३ वा वाढदिवस आहे. ब्रह्मानंदम यांनी तब्बल १ हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लोक त्याला विनोदी कलाकार म्हणून पडद्यावर पाहतात.
ब्रह्मानंदम वाढदिवस हे तेलुगु सिनेमाचे एक मोठं नाव आहे. आपल्या दमदार विनोदी भूमिकांमधून ते प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतात. त्यांच्या भूमिकांमधील वैविध्य हे त्यांचातील उच्च प्रतीच्या प्रतिभेचं उदाहरण आहे. ब्रह्मानंदम आपल्या कॉमिक टाइमिंग, मजेदार पात्र आणि पडद्यावरील मजेसाठी प्रसिध्द आहेत. त्यांनी तेलगू तसेच कन्नड आणि तमिळ सिनेमातही काम केले आहे.आज ब्रह्मानंदम त्यांचा ६३वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांचा चाहता वर्ग इतका मोठा आहे कि, #Brahmanandam हा हॅश टॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. मोठ्या संख्येने लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत.
ब्रह्मानंदम यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झाला. त्याने लक्ष्मीशी लग्न केले. ब्रह्मानंदमला राजा गौतम आणि सिद्धार्थ अशी दोन मुले आहेत. कोणत्याही जिवंत अभिनेत्याद्वारा सर्वाधिक स्क्रीन क्रेडिटचा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड देखील आहे त्याच्या नावावर आहे. २००९ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे.
ब्रह्मानंदम यांनी आपल्या चित्रपट प्रवासाची सुरुवात १९७७ च्या ‘अह ना पेलांता’ या चित्रपटापासून केली होती. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना पाच नंदी पुरस्कार मिळाले आहेत. त्याला फिल्मफेअरचा बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड (तेलगू) देखील मिळाला आहे. त्याला सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा सिनेमा cineMAA पुरस्कारही देण्यात आला आहे. जानेवारी २०१९ मध्ये ब्राह्मणंद यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
अंबाबाई किरणोत्सव सोहळा: मावळत्या सूर्य किरणांचा अंबाबाईला अभिषेक
धक्कादायक! मानवतमध्ये पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच निघाला मारेकरी
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेयर मार्केटचा मूड खराब; सेन्सेक्स 800 अंकांनी खाली आला