डॅशिंग महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत रमताना..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MSD स्पेशल | तू सगळं दिलंयस रे आम्हाला पण आमच्या स्वार्थी मानवी स्वभावाचं काय ? ये दिल मांगे मोर म्हणत म्हणत गालावरची दाढी पांढरी झाली, तरी तू ब्रावोला २ धावा घेताना दमवलंस,

“ओय चिकू दिमाग थँडा रखा कर, बार बार नहीं बताऊंगा!”
” इधर देखले, वहा कहा देख रहा है ?”
रैना एकदा म्हटला होता, धोनी सारखा राग कोणाला येत नाही, त्याची झलकच तू आफ्रिकेत दाखवलीस. तेव्हा पासून मला वाटतं मनीष पांडेने तुझी दहशत घेतली असणार.

The Asian Age ला दिलेल्या मुलाखतीत पार्थिव पटेलने धोनी बद्दल सांगत होता,
“२००२ साली १८ वर्षांचा असताना मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यष्टीरक्षक म्हणून निवडलं होतं नंतर लगेच इंग्लडला नेटवेस्ट सिरीजसाठी तामिळनाडूच्या दिनेश कार्तिकची संघात वर्णी लागली. २-३ वर्ष मी कसोटीत व कार्तिक वनडेत असं मस्त सुरु होतं. त्यात संघात fab 5 म्हणजेच दादा, सचिन, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण आणि जोडीला युवी, कैफ असल्यामुळे मॅच फिनिशिंग वैगेरे असली भानगड कधी वाट्याला आली नाही. बॉल बॅटला लागणार रामभरोसे आणि भज्जी आणि कुंबळेच्या wrong one ला स्टम्पिंग केलं तर सोन्याहून पिवळं. मग २००४-०५ साली वाळवंटात अमरनाथ यात्रेचा बर्फ पडावा आणि आमच्या कारकिर्दीचा पूल lighting stumping सारखा उधळावा असं झालं. बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत असणाऱ्या लागोपाठ दौऱ्यावर एका मोठ्या केसाळ, धिप्पाड पोराची दादाने निवड केली होती. कसाही स्टान्स, अंगी बैलाची ताकद, बॅट म्हणजे धोपाटणं आणि बॉल सीमारेषेवर पाठवणं एवढंच याचं काम, पण लाहोर, पेशावरमध्ये राणा नावेद, मोहम्मद सामीच्या चुराड्यासोबत त्याने आम्हाला स्टेडियम बाहेर नेऊन फेकलं कमी हाकललं जास्त. जंगल में चुनाव नहीं होते , शेर अपनी ताकद से खुद राजा कहलाता है, ह्या म्हणीचा अर्थ तेव्हा समजला. आम्ही आमच्या स्वता:च्या खेळापुरतेच मर्यदित असायचो, पण धोनीचं तसं नव्हतं. तो उत्कृष्ट गेम रीडर आहे. यष्टीमागे उभं राहून तो सचिन, द्रविड, दादा यांना बॅट्समन पुढच्या चेंडूला काय करेल, हे फक्त स्टान्स बघून सांगयचा. जे आम्हाला ह्या जन्मी तरी शक्य नाही.”

प्रत्येक सामन्यात ५ ओव्हर्स पुढं असणारा तू..
कोहली सारख्या वर्गातल्या सर्वात खट्याळ, राडेबाज पोराला जागेवर आणून मॉनिटर बनवणारा तू..
पांड्यानंतर आता शार्दूल, कुलदीप, रीषभ पंत सोबत ईशान किशनला लढायला कमी जिंकायला शिकवणारा तू…

आम्हाला माहितीये टेस्ट सारखंच कुठलाही farewell न घेता तू एकदिवस T20 आणि वनडेमधून ट्रॉफी नवोदितांच्या हाती सोपवल्यागत गपचूप ह्या खेळाचा निरोप घेत फ्रेमच्या बाहेर जाशील, आपल्या पोरीला कडेवर घेऊन खेळण्यासाठी. पण केळीच्या देठातून तुझा सुटलेला निस्वार्थी बाण मात्र आमच्यासारख्या कित्येक चाहत्यांच्या काळजाच्या आरपार जाईल याची कल्पना करणे मात्र ब्रम्हदेवाला ही शक्य नाही. कारण आम्ही उरफाट्या काळजाचे चाहते.. तुझ्या बाबतीत स्वार्थ आणि प्रेम दोन्ही जास्तच..
आणि महत्वाचं म्हणजे, दादा ने दिलेलं statement “तू ज्या दिवशी क्रिकेट खेळणं बंद करशील त्या दिवशी तुझ्या घराबाहेर तुझ्या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणारा मी पहिला असेल.”
कदाचित आता तर थाला लव्हर्सचा वेगळाच प्रांत असलेले लोक ही पाठींब्यास आणि निषेधास येतील.

आपल्या ध्येयांवर, देशावर आणि खेळावर तुटून प्रेम करायला तू शिकवतोस…
खरंच वतन के आगे कुछ भी नहीं, ना तुम ना हम..

परवेज मुशर्रफ, देखो..माही अब भी मार रहा है!❤️

  • अविनाश रामदास जैड यांच्या लेखणीतून आणि playsoftech live च्या फेसबुक पेजवरुन साभार

Leave a Comment