साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे

सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पाथरी येथील साईबाबा जन्मस्थानाचा शोध हा पाथरीकरांनी लावलेला नसून तो मुंबईच्या एका साईभक्ताने लावला असल्याबाबत सांगितल्यानंतर वाचकांना आश्चर्च वाटेल. विश्वास बाळासाहेब खेर असं या साईजन्मभूमीचा शोध लावणाऱ्या साईभक्ताचे नाव असून त्यांनी साईबाबा जन्मस्थानांविषयी आस्था ठेवत तब्बल पंचवीस वर्ष संदर्भ अभ्यास व संशोधन केलं. त्यानुसार जुन्याकाळीचे पार्थपुर म्हणजे वर्तमानातील आजचे पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याची माहिती त्यांनी केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.

विश्वास बाळासाहेब खेर यांनी साईबाबाच्या जन्मस्थानाचा शोध घेताना नेमका काय अभ्यास केला. त्यासाठी कुठले पुरावे गोळा केले. सोबतच पाथरीत उत्खनन करून त्यांना काय सापडले. ज्या आधारावर पाथरीमध्ये साई मंदिर बांधण्यात आलं याविषयीची माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट-

साईबाबा जन्मस्थळाचा संशोधना संदर्भातील घटनाक्रम खालीलप्रमाणे-

जून १९७५ मध्ये संशोधक साईभक्त व्हि.बी .खेर यांनी पाथरी गावात पहिल्यांदा भेट दिली. त्यानंतर १ जून १९७८ ला श्रीसाई स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. पुढे या समितीने प्राध्यापक र.स. भुसारी (साईबाबांचे वंशज) यांच्याकडून श्री साईबाबा जन्मस्थान जमीनीची खरेदी केली.

३१ डिसेंबर १९८० मध्ये श्री साई स्मारक समिती हिची सार्वजनिक न्यास म्हणून नोंदणी करण्यात आली. तर मार्च १९८१ मध्ये मुंबईचे आर्किटेक दळी यांनी मंदिराचा आराखडा तयार केला.

पुढे १३ऑक्टोबर १९९४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी नियोजित मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले .

मे १९९५ मध्ये नियोजित मंदिराच्या बांधकामाच्या दरम्यान मारुती व खंडोबाच्या मूर्ती तसेच जाती पण त्या पूजेची उपकरणे इत्यादी वस्तू उत्खननामध्ये सापडल्या.

१० जून १९९५ मध्ये मंदिराच्या पायाभरणीचा समारंभ करण्यात आला. हे काम चालू असताना १८ जुलै १९९५ रोजी खोदकामात दोन कमानी व एक भुयार सापडल्याने हे मूळ घराचे अवशेष म्हणून जतन करण्यासाठी तळघराचे बांधकाम करण्याचे ठरले.

१२ ऑक्टोबर १९९९ रोजी शिल्पकार हरीश तालीम, तालीम आर्ट स्टुडिओ मुंबई यांनी घडवलेली साईबाबांची पंचधातूची मूर्ती श्री साईबाबा जन्मस्थान स्मारक समिती मुंबई यांनी भव्य दिव्य मिरवणूक काढून मोटार मार्गाने शिर्डी मार्गे पाथरी शहरात आणण्यात आली.

१९ ऑक्टोबर १९९९ विजयादशमी रोजी चेन्नई येथील साई भक्त के .व्ही. रमणी यांच्या हस्ते साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे उद्घाटन केले होते.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloNews”

हे पण वाचा –

साखरपुडा झालेल्या तरुणीचे प्रियकराने मोटारसायकलवर येऊन केले अपहरण

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार

फेसबुक वरच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी मुंबईच्या या पठ्ठ्यानं थेट पाकिस्तान गाठलं, पुढे झालं असं काही!!

तीन वर्षाच्या बालिकेवर आत्याच्या नवर्‍याकडून बलात्कार

Leave a Comment