वडापावचा जन्म नेमका कसा झाला? जाणुन घ्या मराठी माणसाच्या भन्नाट आयडियाची सुसाट गोष्ट

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मुंबईचा वडापाव म्हंटल तर तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर गरिबांचा ‘बर्गर’ म्हणूनही सर्रास वडापाव ओळखला जातो. हा मुंबईचा वडापाव मुंबई सारखाच फेमस आहे. मुंबईत स्थायिक होऊन आपली तरक्की केलेलं लोकांच्या तोंडी एक वाक्य कायम असत ‘वडापाव खाऊन दिवस काढलेत’. पण वडापाव आता महाराष्ट्रात ही जोरदार फेमस आहे. कमी पैशात लोकांचं भूक भागवनारा या वडापावचा जन्म एका व्यक्तीच्या भन्नाट कल्पनेतून झाला आहे. तर वडापाव म्हणजे काय हे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे आता विषय न वाढवता आपण हा माणूस कोण आहे जाणून घेऊयात…

वडापावचा जन्म १९६६ साली झालाय!

दादर स्टेशनजवळच्या एका चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी आपलं वडे आणि पोहे विकण्याचं दुकान १९६०च्या दरम्यान सुरु केलं. आजूबाजूच्या दुकानातही असेच काही खाण्याचे पदार्थ मिळत होते.  १९६६ च्या दरम्यान अशोक वैद्य यांना एक आयडियाची कल्पना सुचली. ती एकदम साधी सोप्पी होती. एका पाव आणि त्याच्या मध्यभागी बटाट्यापासून तयार केलेल्या वड्याला ठेवायचं,
बस एवढंच !! बटाटा आणि वडा यांची ही जोडी काहीच दिवसात एवढी सुपर हिट झाली की इतरांनी त्याची कॉपी करायला सुरुवात केली. इथूनच मुंबईत वडापावचा जन्म झाला आणि ज्याची चव ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली.

१९९८ साली अशोक वैद्य निवर्तले. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा नरेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. वडापावचा जन्माचं ठिकाण आजही अगदी तसंच आहे, जसं १९६६ साली होतं. अशोक यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही पण त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षणाबरोबर दुकानही सांभाळलं. १९७० आणि १९८० दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात अनेक कारखाने बंद झाले होते,तेव्हा अनेकांनी वडापावचा स्टॉल लावून आपल्या धंद्याला सुरुवात केली होती…

१९७० आणि १९८० च्या दरम्यान अनेक कारखाने बंद पडले आणि हजारो मजुरांना कामाची कमतरता भासू लागली आणि मग अनेकांनी वडापावचा स्टॉल टाकून आपलापल्या धंद्याला सुरुवात केली होती. आणि या साठी त्यांना आपल्या महाराष्ट्रातील तेव्हाची पार्टी शिवसेनेने हे काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले होते. जेव्हा शिवशेनेच्या बैठका होत होत्या तेव्हा तेथील लोकांना वडापाव चा अल्पोआहार देण्यात येत असे.

तेव्हा दक्षिण भारताची प्रसिध्द डिश उडुपी खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जायची पण जेव्हा वडापावची सुरुवात झाली तेव्हा वडापाव ने त्या डिशला सुध्दा मागे टाकले जाते. आणि देशाच्या प्रत्येक राज्यात तसेच विदेशात वडापाव फेमस झालाय. असा आपल्या मातीतला वडापाव लोकल टू ग्लोबल पर्यंत पोहचला आहे. मराठी माणसाच्या भन्नाट आयडियाने शोध लागलेला वडपाव सुसाट वेगाने कधी ग्लोबल झाला ते कळालं देखील नाही.

अन्वय गायकवाड
(लेखक औरंगाबाद येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook