बॉलिवुडविशेष लेख

हॉलिवूड चित्रपट का पहावेत?

Untitled design
Untitled design

चित्रपटनगरी | अतुल नंदा

हिंदी किंवा मराठी चित्रपटांना कमी लेखण्यासाठी हा प्रपंच नाही तर दर्जेदार कलाकृती पासून दूर ठेवून आपला प्रेक्षक अडाणी राहतोय का? की अडाणी ठेवला जातोय? याचं विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण युट्युब सुरु झाल्यापासून हिंदी चित्रपटांचे ट्रेलर आपण सगळे पाहत आलो आहोत. ट्रेलर चा हेतू उत्सुकता वाढवणे नक्कीच आहे. आणि म्हणूनच प्रेक्षक चित्रपट गृहाकडे वळतो. ट्रेलर पाहून चित्रपट गृहाकडे जाईपर्यंत काहीतरी हॅपनिंग पाहणार म्हणून प्रेक्षक प्रचंड उत्सुक असतो. चित्रपट पाहिल्यानंतर मात्र ट्रेलर पाहून जेवढं समाधान मिळतं त्यापेक्षा काकणभर तरी अधिक समाधान मिळणं अपेक्षित असत. मग इथे आपले चित्रपट सपशेल फेल जातात. एकूण चित्रपटाचं नावीन्य दोन मिनिटाच्या ट्रेलर मध्ये संपून जातंय तर संपूर्ण चित्रपट पाहायची औपचारिकता तरी का करावी? हा प्रश्न पडतो. असं सगळ्या चित्रपटांच्या बाबतीत होत नाही पण बहुतेक चित्रपट तरी हीच री गिरवत आहे. अशा वेळी हॉलिवूड किंवा त्यासारखे विदेशी चित्रपटांसोबत आपल्या चित्रपटांची तुलना साहजिकच आहे. चित्रपटांचा हेतू मनोरंजन असतो त्याचा सामाजिक परिणाम किती होतो याबद्दल चर्चा होऊ शकते.

बॉलिवूड चित्रपटांची परिस्थिती

हिंदी किंवा मराठी चित्रपटांमुळे आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय का? किंवा आहे त्या परिस्थितीत तो तडजोड करून मर्यादित मनोरंजन करून घेतोय? हा मुख्य प्रश्न आहे. कारण जे काही नवीन चित्रपट येताय ते प्रेक्षकांना नवीन काही तरी देताय यापेक्षा बाजारात काय चालतंय बघून एकाच पठडीतले चित्रपट समोर आणले जातात. त्यात हे चित्रपट कसे चालतील याचं ठोकताळा ठरलेला असतो. कथेशी कसलाही संबंध नसलेली गाणी अगोदर प्रदर्शित करून चित्रपटांची जाहिरात जोरात करायची. त्या जोरावर गल्ला जमवायचा. सुरवातीच्या काही दिवसात प्रेक्षक किमान काय आहे म्हणून तरी चित्रपट बघायला येतील अशी धारणा ठेवायचे. तो चित्रपट लोकांना आवडतोय का यांचा बिल्कुल विचार न करता पुन्हा पुन्हा तीच पद्धती वापरून प्रेक्षकांना मूर्ख बनवून चित्रपट गृहापर्यंत खेचायचं. जाहिरात करून गर्दी खेचली जाते, त्या पद्धतीने प्रसिध्द नट घेऊन चित्रपट बनवायचा. कथेनुसार नट न निवडता त्याच्यानुसार कथा तयार करायची म्हणून कथा आणि पटकथा याकडे फारस लक्ष न देता हिरोच्या बोलण्या चालण्याने जेवढ मनोरंजन होईल तेवढ भावनिक समाधान आपला प्रेक्षक करून घेतो. त्यामुळे कथेतल नाविन्य आलटून पालटून सगळ्या चित्रपटात सारखच दिसतं. समजा एखादा ऍक्शन चित्रपट खूप चालतोय तर फक्त ऍक्शन कडे लक्ष द्यायचं, बाकी देण घेण नाही. केवळ ऍक्शन बघून चित्रपट कधीच पूर्ण समाधान देत नाही कारण, चित्रपट गृहाबाहेर पडल्यावर कथेची चर्चा करायला लोकांना आवडते. कारण ऍक्शन कितीही प्रभावी असली तरी स्मृतीत फार काळ राहत नाही. मानवी स्वभावानुसार घटना एकमेकांना जोडल्या असतील तरच जास्त काळ लक्षात राहतात. अशावेळी घटनेनुसार ऍक्शन निश्चितच सुखद अनुभव असतो. ऍक्शन ठीक आहे समजा, पण बऱ्याच वेळी एकाच कथेचा प्लॉट घेऊन दोन तीन चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित केले जातात. नायक नायिकेची अदला बदली सोडली तर नवीन असं काहीच नसतं.
काही दिग्दर्शक चांगल्या कथा निवडून प्रयोग करत असतात. पण कथा खूप गुंतागुंतीची घेतली तर यशस्वी मांडणी होईल का नाही या भीतीने प्रसिध्द निर्माते,दिग्दर्शक नवीन प्रयोग करायला धजतच नाही. परिणामी रिमिक्सचा आधार उरतो. त्यातून बक्कळ पैसा पण मिळतो. त्यात एकूणच चित्रपटावर फार काम करण्याची गरज पडत नाही. मग सिनेमा मागे पडतो आणि प्रेक्षक सुद्धा आहे त्यात समाधान शोधून गप्प बसतो.

बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत हॉलिवूड चित्रपट

इंग्लिश भाषा कळत असली तरी सुद्धा हॉलिवूड चित्रपट आपल्या मातीतले नसल्याने त्या चित्रपटात आपलेपणा शोधायला आपल्या प्रेक्षकांना अवघड जातं. जरी त्या चित्रपटानां स्थानिक भाषेत डब केल तरी पण दोन पात्रांमाधला संवाद दोन माणसांमधला वाटत नाही. म्हणूनच कदाचित आपला प्रेक्षक स्थानिक भाषेतल्या चित्रपटानां चिटकून आहे. पण म्हणून चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकाना गृहीत धरणे म्हणजे चित्रपट माध्यमातील प्रत्येक कलाकाराला आणि त्याच्या कलेला मर्यादा आणल्यासारखे आहे.
आपल्याकडचा एक वर्ग अग्रक्रमाने इंग्लिश किंवा इतर परदेशी चित्रपटच बघत असतो. हा वर्ग हिंदी किंवा इतर स्थानिक भाषेतले चित्रपट पाहणे का टाळतो? किंवा तो ते चित्रपट फॉरवर्ड करून का बघतो? याचा सारासार विचार केला तर…

हॉलिवूड चित्रपट का पाहावे??? याचं उत्तर मिळतं… एखादा सीन मिस झाला तर चित्रपटाची मजा कमी होईल किंवा परत समजणार नाही ही भीती आपल्याला बिल्कूल नसते. यावरून एकूण चित्रपट सुमार बनला आहे, जो कुठूनही पहिला तरी अडचण येत नाही. याचं तुलनेत इंग्लिश चित्रपट पहिल्या दहा मिनिटात कथेतल्या पात्रांची ओळख करून देऊन क्लायमॅक्सकडे वळतो सुद्धा. चित्रपटाची कथा फारशी दमदार नसली तरी पटकथेची मांडणी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते. शेवटी काही तरी वेगळ झाल्याच्या समाधानात प्रेक्षक असतो. त्या तुलनेत बहुतेक हिंदी चित्रपटांची अवस्था पहिले तासभर सुद्धा हललेली नसते. आणि शेवटी कथानक संपवण्याची घाई असल्याने कसाबसा चित्रपट संपतो. हिंदीत किंवा मराठीत चांगले चित्रपट बनवले जाऊ शकत नाही किंवा तसे लेखक दिग्दर्शक आपल्याकडे नाहीत असं अजिबात नाही.

पण मुख्य सिनेमा लाईन मध्ये वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचा धोका पत्करायला कोणी तयार होत नाही. यावर नेटफ्लिक्स सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममूळे मात करता आली. हॉलिवूड चित्रपटानां तोडीस तोड अनेक चित्रपट आणि वेब सिरीज तिथ आल्या. आणि त्यांना प्रतिसाद ही उत्तम मिळतो आहे. लोकांना जास्तीत जास्त उत्तम कलाकृती जर ऑनलाईन मिळू लागल्या आणि त्यांची मागणी वाढली तर खास चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे जाणारा वर्ग कमी होत जाईल. निर्मात्यांना चित्रपट कसा असावा याचं जस स्वातंत्र आहे तसच प्रेक्षकांना कोणता चित्रपट पहायचं हे पण स्वातंत्र आहे.

इतर महत्वाचे –

इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी

“हिरवट डोळ्यांची ती मुलगी जिने जगाला बंदिवान बनविले होते.”

प्रियांका चोप्राला मोह पाडणारा निक जोनस नक्की कोण आहे ? जाणुन घ्याच

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares