Special Trains For Pandharpur : आषाढी वारीसाठी विदर्भातून विशेष ट्रेन; कसं आहे वेळापत्रक?

Special Trains For Pandharpur (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Special Trains For Pandharpur । आषाढी एकादशी वारी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा 800 वर्षांहून अधिक काळापासून चालत आली आहे. याकाळात राज्यभरातील भाविक वारकरी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असतात. वारकऱ्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी सरकार आणि प्रशासनही प्रयत्नशील असते. याच पार्श्वभूमीवर विदर्भातील विठ्ठलाच्या भक्तांना पांडुरंगाचे दर्शन घेता यावे यासाठी रेल्वे विभागाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. या ट्रेन कोणत्या असतील? कोठून कुठपर्यंत ती धावेल याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.

१) नागपूर-मिरज विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01205 विशेष ट्रेन 04 आणि 05 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01206 स्पेशल मिरजहून 05 आणि 06 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत, दळगाव, कवठे महांकाळ, सलगरे , आरग आणि मिरज या स्थानकांवर थांबेल.

२) नवीन अमरावती-पंढरपूर विशेष गाड्या– Special Trains For Pandharpur

ट्रेन क्रमांक ०१११९ २ आणि ५ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता नवीन अमरावतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.१० वाजता पंढरपूरला पोहचेल. त्यानंतर ट्रेन क्रमांक ०११२० विशेष गाडी ३ जुलै आणि ६ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता पुन्हा नवीन अमरावतीला येईल. हि ट्रेन बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकांवर थांबेल.

३) खामगाव-पंढरपूर विशेष गाड्या

ट्रेन क्रमांक ०११२१ विशेष ट्रेन ३ आणि ६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर मध्ये पोहचेल. यानंतर ट्रेन क्रमांक ०११२२ विशेष गाड्या ४ आणि ७ जुलै रोजी सकाळी ५.०० वाजता पंढरपूर येथून सुटतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता खामगाव येथे परत येईल.या ट्रेनला जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा असेल. Special Trains For Pandharpur

४) भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या

ट्रेन क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष ट्रेन ५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता पंढरपूरला पोहचेल. त्यानंतर ट्रेन क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष ट्रेन ६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता पंढरपूरहून सुटतील आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० वाजता भुसावळला येईल. हि ट्रेन जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबेल.