Thursday, March 30, 2023

कॅच पकडण्यासाठी वडिलांनी कडेवरच्या मुलीला खाली सोडले आणि… ( Video)

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका हातामध्ये बिअर आणि दुसऱ्या हातामध्ये लहान मुलगी घेऊन मॅच पाहत असलेल्या वडिलांच्या एका कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. हा व्हिडिओ एका बेसबॉलच्या मॅचमधला आहे. या व्हिडिओमध्ये बेसबॉल मॅचचा आनंद घेत असलेल्या या व्यक्तीच्या दिशेने अचानक बॉल आला. त्यावेळी त्याचे दोन्ही हात मोकळे नव्हते, तरीही त्याला तो कॅच सोडायचा नव्हता.

- Advertisement -

तेव्हा त्या व्यक्तीने पुढचा मागचा कोणताही विचार न करता त्याने मुलीला खाली सोडले आणि कॅच पकडला. तो कॅच पकडल्यानंतरही त्याचे जजमेंट कायम होते. त्याने नंतर लगेच कॅच घेतलेल्या हाताने खाली पडत असलेल्या मुलीला पकडले. अवघ्या एका क्षणात डोळ्याची पापणी लवण्यापूर्वी या व्यक्तीने कॅच, बिअर आणि मुलगी या तीन्ही गोष्टी पकडल्या. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

या व्यक्तीचे नाव अद्याप समजले नाही आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील बेसबॉल मॅचमधला आहे. काही जणांनी हा व्हिडीओ पाहून या व्यक्तीच्या चपळतेचे कौतुक केले आहे तर काहींनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. या व्हिडीओतील व्यक्ती ही निष्काळजी पालक आहे. या मुलीच्या आईने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या निष्काळजी बापाची काही खैर नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रियादेखील सोशल मीडियावर वायरल होत आहेत.