Wednesday, March 29, 2023

संगकारा म्हणतो,‘या’ भारतीय गोलंदाजासमोर बॅटिंग करणं अवघड

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि डावखुरा फलंदाज कुमार संगकारा हा श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत संगकारा सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या कारकीर्दीत त्याचा सामना बऱ्याच चांगल्या गोलंदाजांशी झाला होता. यातील 2 गोलंदाजांचा सामना करणे संगकारासाठी कठीण होत असे दस्तुरखुद्द कुमार संगकारानेच सांगितलं आहे.

यातील पाहिलं नाव आहे पाकिस्तानचे दिग्गज वसीम अक्रम यांचं.“वासिम अक्रम याची गोलंदाजी खेळणं म्हणजे वाईच स्वप्न होतं.अस संगकारा म्हणाला. तसेच भारताच्या जहीर खानची गोलंदाजीदेखील मी अनेकदा खेळलो आहे. त्याच्यासमोर उभं राहून फलंदाजी करणंदेखील खूपच कठीण होतं”, असे संगाकाराने एमसीसीच्या अधिकृत वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

- Advertisement -

कुमार संगकाराने 134 कसोटी सामन्यात 12400 धावा केल्या असून त्यात 38 शतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेट मध्ये संगकाराच्या नावावर तब्बल 14234 धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेट मध्ये त्याने 25 शतके मारली आहेत.