तिलारी घाटात बस अपघातात ५ जण जखमी; संरक्षण भीतीमुळं थोडक्यात बचावले प्रवाशांचे जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आगाराच्या कोल्हापूर-पणजी बसला तिलारी घाटात अपघात होऊन पाचजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने बसमधील ४० प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

कोल्हापूरहून पणजीकडे जात असलेल्या एसटी बसला (एम.एच. 14 बी.टी 3572) तिलारी घाटातील दुसऱ्या अवघड वळणावर अपघात झाला. कागल आगाराची सकाळी कोल्हापूरहून पणजीला जाणारी एसटी बस तिलारी घाटात आली असता घाट सुरू झाल्यानंतरच्या दुसऱ्याच वळणावर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीवर धडक बसून गाडी स्थिरावली. अन्यथा मोठा अपघात घडला असता. सुदैवाने एसटीतील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. मात्र अन्य प्रवाशी सुखरूप राहिले. एसटी बसमध्ये एकूण ४० प्रवाशी होते.

तिलारी घाटात बस आली आणि अचानक बस एका वळणावर बाजूला गेली आणि संरक्षक भिंतीला मोठी धडक बसली त्यावेळी आतील प्रवाशांवर मोठा आघात झाला आणि त्याचवेळी बस संरक्षक कठडय़ावर स्थिरावल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अपघातानंतर बरेच प्रवाशी घाबरलेल्या स्थितीत होते. चंदगड आगारप्रमुख विजय हवालदार यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment