एसटी बसच्या धडकेत Ertiga कारचा अक्षरशः चक्काचूर; 2 ठार, 4 गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परत जाताना भाविकांच्या कारला एसटीची समोरासामोर धडक बसून भीषण अपघात घडला आहे. पंढरपूर- सोलापूर मार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये कार मधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरहुन सोलापूरकडे (solapur) जात असताना भाविकांच्या चार चाकी (एमएच ११ बीव्ही १९४२) वाहनास समोरून येणाऱ्या उस्मानाबाद आगाराच्या एसटी बसने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर अर्टिगा कार उलटली आणि रस्त्याच्या कडेला गेली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.

दरम्यान, अपघातस्थळी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक पोहोचले असून पोलिसांनी सहा जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय व खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे.

Leave a Comment