एसटी- ट्रकचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू तर 8 गंभीर जखमी

बीड | बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. लातूर-अंबाजोगाई रोड वर आज सकाळी हा अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप आजून समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा अपघात झाला. ही बस लातूरहून औरंगाबादला निघालेली होती. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीसही दाखल झाले