कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जात आहे. त्यांना पाठींबा म्हणून कराड येथील कर्मचाऱ्यांच्या वतीनेही संप केला जात आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्यावतीने आज राज्य सरकारचा १३ वा घालून निषेध नोंदविण्यात आला. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही. आज सरकारचा तेरावा घालत आहोत. पुढे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारची अंतयात्रा काढू, असा इशारा कराड येथील आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.
कराड येथील एसटी महामंडळाच्या आगारासमोर कर्मचाऱ्यांच्यावतीने अनोख्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकावर टीका केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जेव्हा डोक्यावरचे मायबापाचे छत्र हरपते तेव्हा तेरावा घालतो. या राज्य सरकारकडूनही कर्मचाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/597573708227517
कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्या नोटिसा त्यांना देत आहे. या सरकारचे काय करायचे म्हंणून थोडीजरी लाज असेल तर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलावे. परिवहनमंत्री हि नुसते चॉकलेट, गोळ्या बिस्किटाबद्दल बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर प्रसंगी सरकारची अंतयात्रा काढणार आहोत, असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आला.