Monday, January 30, 2023

रूग्णसंख्या स्थिर : सातारा जिल्ह्यात नवे 833 पाॅझिटीव्ह तर 922 कोरोनामुक्त

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 833 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 922 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 447 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 79 हजार 778 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 64 हजार 361 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 32 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

खटाव तालुक्यातील कोरोना सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी

खटाव तालुक्यातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांना गावातच उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने व ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने खटाव तालुक्यात विविध गावांमध्ये सुरु कलेल्या विविध कोरोना केअर सेंटरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेटी देवून व्यवस्थेची पहाणी केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकतेच म्हासुर्ने, चितळी, कलेढोण, सातेवाडी, भुरकवाडी, नीढळ याबरोबर कलेढोण येथील रुग्णालयाला भेटी दिली. या भेटी प्रसंगी प्रांताधिकारी जनार्धन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गट विकास अधिकारी रमेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी युनिस शेख आदी उपस्थित होते.