पुणे प्रतिनिधी |
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदी सुनील कांबळे यांची निवड़ झाली आहे.
गेल्या दीड वर्षापासून तो पदभार योगेश मुळीक यांच्याकडे होता. अखेर भाजपच्या वतीने कांबळे यांनी भरला. कांबळे यांचा अर्ज हा विजया कड़े घोड़दौड़ करत होता यात शंका नव्हती. कारण संख्या बळ जास्त असल्याने स्थायी समितीची अध्यक्ष जवळजवळ भाजप चा निश्चित होता.
नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे म्हणाले ” शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अस त्यांनी नमूद केलं. तसेच ज्या योजना मागच्या काळातील राहिल्या असतील त्या सोडवण्यास प्राधान्य देणार आहोत.” दरम्यान कांबळे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे यांनी निवडणुकीच्या वेळी पक्ष आदेशानुसार माघार घेतली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याशी सकाळी बोलनं झाल्याचा दावा या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला. निवड झाल्यानंतर कांबळे यांचं अभिनंदन करताना पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे , संजय भोसले, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.