Business Idea : हिवाळ्यात अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आपण एका जबरदस्त बिझनेस आयडिया माहिती घेउयात. हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळू शकेल. तसेच या व्यवसायासाठी जास्त भांडवलाची देखील गरज नाही. हा व्यवसाय कमी खर्चात देखील सुरू करता येईल. तर आपण ड्राय फ्रूट्सच्या व्यवसायाबाबत जाणून घेउयात…

थंडीच्या काळात शरीराला ऊर्जा देण्यासाठी लोकांकडून ड्राय फ्रूट्सचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. कारण ड्राय फ्रूट्सद्वारे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप मदत होते. बदाम, अक्रोड, सुकी द्राक्षे, काजू यांसारखे ड्राय फ्रूट्स थंडीच्या वातावरणात आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करून चांगले पैसे कमवता येतील.

How to start a dry fruit business: Benefits and requirements

अशा प्रकारे करा सुरुवात

ड्राय फ्रूट्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही मोठ्या बाजारातून स्वस्त दरात ड्राय फ्रूट्स खरेदी करून आपल्या परिसरात किंवा मार्केटमध्ये किरकोळ दराने विकता येतील. याद्वारे चांगला नफा देखील मिळेल. मोठ्या बाजारातून स्वस्त दरात ड्राय फ्रूट्स विकत घेऊन आपल्या परिसरात किंवा बाजारपेठेत किरकोळ दराने विकणे याला ड्राय फ्रूट्सचा होलसेल बिझनेस असे म्हणतात. Business Idea

Mixed Nuts And Dried Fruits Stock Photo - Download Image Now - Fruit, Dry, Nut - Food - iStock

कोणताही अतिरिक्त खर्च नाही

ड्राय फ्रूट्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. अगदी छोट्या स्तरापासून याची सुरुवात करून नफ्यानुसार व्यवसाय आणखी वाढवता येईल. Business Idea

The 7 Prolific Dry Fruits you can Assimilate into your Diet to Keep your Overall Fitness Healthy - Sentinelassam

लोकेशन महत्वाचे ठरेल

कोणत्याही व्यवसायासाठी त्याचे लोकेशन खूप महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत ड्राय फ्रूट्सचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर भाड्याने दुकान घ्यावे लागेल. यासोबतच गोडाऊनचीही गरज भासू शकेल. तसेच जर आपले घर गर्दीच्या ठिकाणी असेल तर घरीही ड्रायफ्रुट्सचा व्यवसाय सुरू करता येईल. Business Idea

Dry Fruits to add to your winter diet

किती पैसे मिळतील ???

ड्राय फ्रूट्सच्या घाऊक व्यवसायात 20 ते 30 टक्के नफा मिळतो. नफ्याच्या दृष्टीकोनातून बघितले तर तो खूप चांगला नफा आहे. या व्यवसायात सुरुवातीला थोडी कमी कमाई होत असली तरीही जसजसा वेळ जाईल तसतसा या व्यवसायात चांगला नफा मिळेल. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
Stock Tips : सणासुदीच्या हंगामात ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स मिळवून देतील मोठा नफा, याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद