Monday, February 6, 2023

दिवाळी नंतर शाळा सुरू करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. विद्यार्थ्यांची काळजी घेऊन शाळा सुरू करता येतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ज्या विद्यार्थ्यांची तब्येत बरी नसेल त्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी व्हिडीओ काॅन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, आदी उपस्थित होते.

- Advertisement -

ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स आहेत त्या शाळांसाठी तात्पुरती पर्यायी जागा शोधणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे दिवाळीनंतरच्या पंधरवाड्यात कोरोनाची (Coronavirus) महालाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’