कोरोना संकटात घरबसल्या २ लाखांत सुरु करा हा बिझनेस! महिन्याला कमवा १ लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या अर्थव्यवस्था मंदावली आहे. ज्यामुळे अनेक लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. यावेळी प्रत्येक व्यक्तीला कोरोना या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान, आम्ही आपल्याला घरी बसून व्यवसाय करण्यासाठीची एक कल्पना सुचवित आहोत. जर आपल्याकडे स्वतःची जमीन असेल आणि आपण कमी गुंतवणूकीसह व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आपण राखेपासून विटा बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी १०० यार्ड जमीन आणि किमान २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यातून तुम्ही दरमहा १ लाख रुपये कमवू शकता. सध्याच्या वेगवान शहरीकरणाच्या युगात, बिल्डर्स फ्लाय अ‍ॅशपासून बनविलेल्या विटा वापरत आहेत. यातून दरमहा ३ हजार विटा बनवू शकता

या विटा पॉवर प्लांटमधून तयार केलेल्या राख, सिमेंट आणि स्टोन डस्ट यांच्या मिश्रणापासून तयार केल्या आहेत. या व्यवसायासाठी, आपल्याला मशीनरीवर सर्वाधिक गुंतवणूक करावी लागेल. यासाठी वापरण्यात येणारी मॅन्युअल मशीनसाठी सुमारे १०० यार्ड जागा लागते. या मशीनच्या माध्यमातून आपल्याला वीट उत्पादनासाठी ५ ते ६ लोकांची आवश्यकता असेल. यासह, दररोज सुमारे ३,००० विटा तयार केल्या जाऊ शकतात. या गुंतवणूकीमध्ये कच्च्या मालाची किंमतीचा समावेश नाही आहे.

ऑटोमॅटिक मशीनद्वारे संधी वाढतात
या व्यवसायात ऑटोमॅटिक मशीनचा वापर केल्याने कमाईची संधी अधिक वाढते. मात्र, या ऑटोमॅटिक मशीनची किंमत ही १० ते १२ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये कच्चा माल मिसळण्यापासून ते वीट बनविण्यापर्यंतचे सर्व काम मशीनद्वारे केले जाते. या ऑटोमॅटिक मशीनच्या साहाय्याने एका तासात एक हजार विटा तयार केल्या जाऊ शकतात म्हणजेच या मशीनच्या सहाय्याने आपण एका महिन्यात तीन ते चार लाख विटा बनवू शकता.

सरकार कर्ज देऊ शकते
बँकेकडून कर्ज घेऊन देखील हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. पंतप्रधान रोजगार योजना आणि मुख्यमंत्री युवा स्वयं-रोजगार यांच्या माध्यमातून या व्यवसायासाठी कर्ज देखील घेता येऊ शकते. याशिवाय मुद्रा लोनचा पर्यायही उपलब्ध आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात माती नसल्यामुळे वीट तयार होत नाही.

डोंगराळ भागात चांगल्या संधी
यामुळे उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब यासारख्या राज्यांमधून विटा मागवल्या जातात, ज्यावर वाहतुकीचा खर्च वाढतो. अशा परिस्थितीत सिमेंट आणि दगडी बांधकाम असलेल्या या विटांचा व्यवसाय या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतो. डोंगराळ भागात सहजपणे दगडांची उपलब्धता देखील असल्याने यासाठीच्या कच्च्या मालाची किंमतही कमी होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment