आजपासून तुमच्या पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलले; खिशावर होणार थेट परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सर्वसामान्यांना आज पुन्हा धक्का बसणार आहे. वास्तविक, 1 मार्च 2022 पासून तुमच्या पैशांशी संबंधित अनेक नियम बदलत आहेत. या अंतर्गत LPG सिलेंडर ते बँकिंग सर्व्हिसेसच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. यावेळीही गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे. या नियमांबद्दल जाणून घेऊयात.

‘हे’ सर्व नियम आजपासून लागू होतील…

ATM मधून पैसे जमा करण्याचे नियम बदलणार आहेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या नियमांनुसार, ATM मध्ये कॅश जमा करण्याच्या सध्याच्या सिस्टीममध्ये काही बदल केले जात आहेत. कॅश डिस्ट्रिब्युशनची सध्याची सिस्टीम काढून टाकण्यासाठी, ATM मध्ये कॅश भरण्याच्या वेळी फक्त लॉकेबल कॅसेटचा वापर करण्याची खात्री केली पाहिजे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शुल्क वाढणार आहे
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने आपल्या डिजिटल सेव्हिंग अकाउंटसाठी क्लोजर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. जर तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सेव्हिंग अकाउंट असेल तर आता अकाउंट बंद करताना तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 150 रुपये असून त्यावर GST देखील भरावा लागणार आहे. बँकेचा हा नवा नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे.

LPG सिलेंडरची किंमत
LPG चे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केले जातात. सरकारने आजपासून म्हणजेच 1 मार्च 2022 पासून LPG सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कमर्शिअल LPG सिलेंडरची किंमत आजपासून 105 रुपयांनी वाढून 2,012 रुपये झाली आहे.

‘या’ बँकेचा IFSC कोड बदलला आहे
DBS Bank India Limited (DBIL) आणि लक्ष्मी विलास बँक (LVB) चे जुने IFSC कोड 28 फेब्रुवारी 2022 पासून बदलले गेले आहेत. वास्तविक, DBS Bank India Limited (DBIL) ने लक्ष्मी विलास बँकेत (LVB) विलीन केले आहे, त्यानंतर तिच्या सर्व शाखांचे IFSC आणि MICR कोड बदलले आहेत. DBIL ने जारी केलेल्या रिलीजनुसार, 1 मार्च 2022 पासून ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS द्वारे पैशांच्या ट्रान्सझॅक्शनसाठी नवीन DBS IFSC कोड वापरावा लागेल.

Leave a Comment