राजू शेट्टींच्या एफआरपी मुद्यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांचे महत्वाचे विधान; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात सध्या ऊसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. अनेक कष्टकरी साखर कारखान्यांकडून यंदाची एफआरपीची रक्कम किती असेल हे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी एकरकमीच हवा यासह विविध मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या मागणीवर राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.

कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा आज 48 वा गळीत हंगामाचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पाडला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीं यांच्याकडून एकरक्कमी एफआरपीची मागणी केली जात आहे. त्यांची अशा प्रकारची मागणी हि कायमीची असते. त्यांनाही माहिती आहे कि, शेतकऱ्यांच्या या मागण्या अनेक असतात. त्यांनीही लोकसभेचे खासदार म्हणून काम पाहिले आहे. त्यांनाही चांगले माहिती आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्याकडून जरी एकरकमी एफआरपीची मागणी केली जात असली तरी शेतकऱ्यांच्याकडून मात्र तीन टप्प्यांत मागण्या केल्या जातात. त्यांनी जरी मागणी केली असली तरी आता आमची राज्य रकारकडून केंद्र सरकारकडे अशी मागणी राहील कि राज्यातील साखरेला 34 रुपये भाव मिळावा, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment