Wednesday, February 1, 2023

Krushna Election Result : राज्य सहकार मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का, रयत पॅनेल तिसऱ्या स्थानावर

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे यशवंतराव मोहिते रयत सहकारी पॅनेल तिसऱ्या स्थानावर आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीत दुपारपर्यंत 5 जागांचा पहिला फेरीचा मतमोजणी पूर्ण झाली होती. या सर्व 5 जागांवर राज्य सहकारमंत्री विश्वजित कदम यांचे रयत पॅनेल तिसऱ्या स्थानावर होते.

- Advertisement -

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज सायंकाळी लागणार असून त्यासाठी मतमोजणी सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत दुपारी तीन वाजेपर्यंत 5 जागांचे पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली होती. या सर्व 5 जागांवरती जयवंतराव भोसले सहकार पॅनेल सर्वच नाव जागावरती आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या नंबरवर ती अविनाश मोहिते यांचे संस्थापक संस्थापक पॅनेल होते तर इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील यशवंतराव मोहिते रयत पॅनेल हे तिसऱ्या स्थानावर आहे.

रयत पॅनलच्या प्रचाराची धुरा राज्य सहकारमंत्री विश्वजित कदम यांनी सांभाळली होती. निवडणूकीत प्रचारासाठी गेले पंधरा दिवस त्यांनी रयत पॅनलचा प्रचार करण्यासाठी कराड, वाळवा, कडेपुर, शिराळा, पलूस या तालुक्यात प्रचार यंत्रणा राबवली होती. आज निकालाची मतमोजणीच्या वेळी सहकार पॅनेलचे सर्व उमेदवारांना पहिल्या फेरीत 10 हजाराच्या घरात तर संस्थापक पॅनेलचे उमेदवारांना 4 ते 4 हजार 500 मते असल्याचे दिसून आले. रयत पॅनेलचे उमेदवार हे 2 ते 2 हजार 500 मते मिळालेली आहेत.