लॉकडाऊन काढण्याची राज्य सरकारमध्ये हिंमत नाही : नितेश राणेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “हे सरकार कोरोनाबाधित व मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवत आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवून या सरकारने राज्यात कोरोनाची परिस्थिती भयानक असल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. हे सरकार ती खरी आकडेवारी दाखवत नाहीय. त्यामुळेच आज लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. सरकारमध्ये लॉकडाऊन काढण्याची हिंमत नाही,ती त्यांनी दाखवावी,” अशा शब्दात टीका करीत आमदार राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबई मॉडेलवरून सडकून टीका करताना राणे म्हणाले,” ठाकरे सरकारचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. मुंबईत सर्व परिस्थिती ठीक आहे तर पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवून मुंबईकरांना का शिक्षा देत आहे हे सरकार? त्यांना उद्योगधंदे सुरु करू देऊ द्या ना. हे सरकार रुग्णांची आकडेवारी लपवत आहे. आमच्याकडून आकडे लपवण्याचा आरोप केला जातो आहे. त्याची कबुली दिली आहे. मुंबई मॉडेल जर यशस्वी झालं आहे तर लॉकडाऊन का वाढवलं आहे? याच उत्तर राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी आमदार राणेंनी केली.

आजही लोकांना ऑक्सिजन मिळत नाहीय, रेमडीसीव्हर इंजेक्शनचाही तुडवडा भासत आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे भीक मागण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. आता तर स्वतःचा मेकअप करण्यासाठी हे सरकार आता कलाकारांकडेही पैसे मागत आहे. हे काम ठाकरे सरकारने रेन ड्रॉप या एजन्सीला दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. शिकसेना भवनातून अनेक कलाकारांनाही फोन केले जातायत. दिशा पटनाईक, करिना कपूर तसेच कतरिना कैफ यांचेहि ट्विटस पहिले तर लक्षात येईल, असेही यावेळी आमदार राणे म्हणाले.

वारंवार राणेंकडून टीका केली जात असल्यामुळे त्यांच्या या टीकेला महाविकास आघाडी सरकारमधील इतर नेते काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत पाहता राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा घेतलेला निर्णय यावरून आता भाजपकडून सरकारवर टीका केली जाणार आहे. मात्र पहिली प्रतिक्रिया हि भाजपचे आमदार नितेश राणेंनी दिली आहे.

Leave a Comment