राज्य सरकार मराठा समाजासोबत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारच्या शिष्ट मंडळासमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात तयार करण्यात आलेले पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य “सरकार मराठा समाजासोबत आहे. या समाजाला आरक्षण मिळवून द्यावे यासाठी लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले”.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून तो केंद्र सरकारला आहे. त्यामुळे आम्ही या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पहिलं पाऊल उचल असून राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.  लवकरच आम्ही पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहोत. तसेच त्यांच्याकडेही पत्राद्वारे आरक्षण मिळवून देण्याची मागणी करणार आहोत, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. फडणवीस यांनी मांडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा जर पारित झाला असता तर आमच्यावर आज राज्यपालांना पत्र देण्याची वेळ आलीच नसती. त्यामुळे आम्ही मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आम्ही मराठा समाजासोबतअसल्याचेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment