कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे हस्ते अत्याधुनिक कॅन्सर उपचार सेंटरचे उद्घाटन

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कॅन्सरवर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कॅन्सरचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज ५८ टक्के कॅन्सर बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. अशाच अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी कराडच्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक उपचार सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे हस्ते करण्यात आले.

कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक उपचार सेंटरचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास हॉस्पिटल प्रशासनाचे अधिकारी, डॉक्टर, हॉस्पिटलचे संचालक दिलीप भाऊ चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा हॉस्पिटल प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आजारावरील सर्व उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन मोफत होणार आहेत.

यावेळी हॉस्पिटलचे संचालक दिलीप भाऊ चव्हाण म्हणाले, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आजारावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक उपचार सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. या सेंटरचा पश्चिम महाराष्ट्रसह कोकणातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. कॅन्सर रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन उपचार होणार असुन हे कॅन्सर उपचार सेंटर अत्याधुनिक साधनसामुग्री तज्ञ डॉक्टरांनी सुसज्ज आहे.

You might also like