Saturday, January 28, 2023

राज्यभरात औरंगाबाद पॅटर्नची चर्चा ; 16 हजारावरून निम्म्यावर रुग्णसंख्या

- Advertisement -

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना औरंगाबादमध्ये १६ हजारांवरून थेट ७ हजारांवर रुग्णसंख्या आल्याने शहर कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

अवघ्या दीड महिन्यातच औरंगाबाद जिल्हा कोरोनावर विजय मिळवताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग दररोज १७०० ने वाढत होता. परंतु, हा आकडा आता ७०० वर आल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवावा, अशा देखील चर्चांना उधाण आलं आहे. औरंगाबादमध्ये राज्यात सर्वात आधी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी कंट्रोल रूमही सर्वात आधी औरंगाबादमध्ये स्थापन करण्यात आली.कडक नाकाबंदी आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले आणि रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं सकारात्मक चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या औरंगाबाद पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यभरात सध्या सुरू आहे