Wednesday, October 5, 2022

Buy now

हिंदू महासभा बनवणार नथुराम गोडसेचा पुतळा; अंबाला तुरुंगातून आणली माती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हरियाणाच्या अंबाला सेंट्रल जेलमधून आणलेल्या मातीने नथुराम गोडसेचा पुतळा बनवणार असल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे. याच तुरुंगात 1949 मध्ये महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी गोडसे यांना फाशी देण्यात आली होती. हिंदू महासभेने सोमवारी दोघांचा ७२ वा बलिदान दिन साजरा केला. त्यानिमित्त हिंदू महासभेने गोडसेंचा पुतळा बनवण्याची घोषणा केली आहे.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज म्हणाले की, संविधानात प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारनेही गोडसे आणि आपटे यांच्या मूर्ती बसवण्यास परवानगी द्यावी. गोडसेची मूर्ती ग्वाल्हेरमध्ये बनवण्यात आली असून अंबालाच्या मातीपासून टिळक बनवून पूजा करण्यात आली आहे. आपटे यांची मूर्ती बनवल्यानंतर ग्वाल्हेर येथील हिंदू महासभा भवन दौलत गज लष्करमध्ये दोघांच्या मूर्तीची एकत्र प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

दरम्यान यावेळी जयवीर भारद्वाज यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोकांची हत्या झाली, असंही म्हटलं.