Stock Market : सेन्सेक्स 138 अंकांनी तर निफ्टी 15,850 च्या वर बंद झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई आठवड्यातील शेवटचा ट्रेडिंगच्या दिवशी शुक्रवार, 23 जुलै रोजी बाजारात प्रचंड वाढ झाली. ट्रेडिंग संपल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही ग्रीन मार्कवर बंद झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक (BSE) 138.59 अंक म्हणजेच 0.26 टक्क्यांच्या वाढीसह 52,975.80 वर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 32.00 अंकांच्या किंवा 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 15,856.05 वर बंद झाला.

एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारच्या व्यापारात सेन्सेक्स 638.70 अंक किंवा 1.22 टक्क्यांच्या तेजीसह 52,837.21 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 191.95 अंक किंवा 1.23 टक्क्यांच्या वाढीसह 15,824.05 वर बंद झाला.

पहिल्या तिमाहीत Biocon चा निव्वळ नफा 35% खाली आला
देशातील सर्वात मोठी फार्मा कंपन्यांपैकी एक असलेल्या Biocon ने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत त्याचा एकत्रित निव्वळ नफा 35.39 टक्क्यांनी घसरून 108.4 कोटी रुपयांवर आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ओडिशा प्लॅंटमध्ये ब्रिटानिया उत्पादन वाढवणार आहे
त्याचबरोबर ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यात आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या विस्तारासाठी 94 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली. दोन नवीन मॅन्युफॅक्चरिंग लाइन तयार करण्यासाठी कंपनीची 94 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. सध्याच्या 35,000 टनांवरून त्याची क्षमता 85 टक्क्यांनी वाढून 65,000 टन होईल. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन करतील. ऑक्टोबर 2022 पर्यंत विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल, ज्यामुळे कंपनीला मेरी गोल्ड, विटा मेरी गोल्डसह त्याच्या फ्लॅगशिप ब्रँडचे उत्पादन वाढविण्यात मदत होईल.

Leave a Comment