Stock Market : शेअर बाजारात सपाट ट्रेडिंग सुरु, निफ्टी 17,600 च्या आसपास करत आहे ट्रेड; ZEE चे शेअर्स 20% वर गेले

नवी दिल्ली । सेन्सेक्स 21.4 अंकांच्या किरकोळ वाढीसह 59,026.67 वर उघडला. त्याचवेळी, निफ्टी 23.60 अंकांच्या वाढीसह 17,585.60 वर उघडला आहे.

बीएसई वर सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान, एनटीपीसीच्या स्टॉकने 1.69% उडी घेतली. दुसरीकडे, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टायटन, सन फार्मा, इंडसइंड बँक, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, इन्फोसिस, बजाज ऑटो, टीसीएस, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डीज, एसबीआय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली

एचडीएफसी, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, अल्ट्रा सिमेंट, एलटी, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, एशियन पेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट दिसून येत आहे.

Zee Entertainment ने सोनी पिक्चर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत विलीनीकरणाचा करार केल्याच्या बातमीनंतर Zee Entertainment चा शेअर 10 टक्क्यांनी उंचावला.

You might also like