Stock Market : Sensex 50,777 अंक तर Nifty 15,232 वर उघडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार वाढीसह सुरू झाला. BSE Sensex 140.40 अंक म्हणजेच 0.28 टक्क्यांनी 50,777.93 वर उघडला. त्याचबरोबर NSE Nifty 24.15 अंक म्हणजेच 0.16 टक्क्यांनी वाढून 15,232.60 वर उघडला. यापूर्वी मंगळवारी बाजारात काही प्रमाणात वाढ झाली. BSE Sensex 14.37 अंक म्हणजेच 0.03 टक्क्यांनी घसरून 50,637.53 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE Nifty 50 च्या वर बंद झाला. Nifty 10.75 अंकांच्या किंचित वाढीसह 15,208.45 वर बंद झाला.

या शेअर्समध्ये झाली वाढ
BSE वर टायटन, एम अँड एम, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, एलटी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, भारती एअरटेल, बजाज ऑटो, रिलायन्स, मारुती, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, अल्ता सिमेंट, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, आयटीसी, डॉक्टर रेड्डी, एनटीपीसी, ओएनजीसी, टीसीएस यांच्या शेअर्सना वेग आला. त्याचबरोबर पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, कोटक बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि एसबीआय यांचे शेअर्स घसरताना दिसत आहेत.

सोन्याच्या आणि क्रूडच्या किंमतींमध्ये वाढ
अमेरिकेत bond yield घटणे आणि doller मधील कमकुवतपणामुळे सोने साडेचार महिन्यांच्या उंचीवर पोहोचले आहे. COMEX GOLD ने 1900 डॉलरची किंमत ओलांडली आहे. कच्च्या तेलामध्येही वाढ आहे. ब्रेंट एक आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

BPCL चे Q4 चे निकाल आज येत आहेत
आज BPCL चे Q4 चे निकाल लागतील. तिमाही आधारावर उत्पन्नामध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि नफ्यात 38 टक्के घट आहे. GRM आणि डिव्हिडंडच्या घोषणेवर नजर ठेवली जाईल. BERGER PAINT आणि MANAPPURAM FIN देखील निकाल सादर करतील.

आज वादळ किनारपट्टीवर धडकेल
आज यास चक्री वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल. अनेक भागात जोरदार वारा पाऊस कोसळत आहे. एकूण 8 राज्यात यास वादळाचा परिणाम दिसेल. आजच्या अनेक फ्लाईट्स कोलकाता विमानतळावरून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment