Stock Tips : दिवाळीत ‘या’ 5 शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : शेअर बाजार पैसे गुंतवण्याच्या लोकप्रिय माध्यमांपैकी एक आहे. याद्वारे अनेक लोकं काही वर्षांतच मालामाल झाले आहेत. मात्र त्यासाठी योग्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये योग्य वेळी पैसे गुंतवावे लागतील. तसेच यासाठी संयम असणेही गरजेचे आहे. दिवाळीमुळे सध्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या काळात असे पाच शेअर्स आहेत जे आपल्या घरी लक्ष्मी आणू शकतील. यंदाच्या दिवाळीत या पाच शेअर्समध्ये पैसे गुंतवून पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत भरपूर नफा कमावू शकाल. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Aditya Birla Fashion named as Asia's most sustainable company

आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल

आगामी काळात 400 नवीन फ्रँचायझी उघडण्याची कंपनीची योजना आहे. तसेच कंपनीकडून आपल्या प्रोडक्ट्सची रेंज देखील वाढवली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, सध्या कंपनीकडे अ‍ॅलन सोली, वेन ह्यूसेन, लुई फिलिप आणि पीटर इंग्लंड सारखे अनेक ब्रँड्स आहेत. कोविडनंतर मॉल्समध्ये येणाऱ्या गर्दीचा फायदाही कंपनीला आता मिळत आहे. तसेच 20 ऑक्टोबर रोजी 330.85 रुपयांवर ट्रेड करत असलेल्या या शेअर्सला ब्रोकरेज कंपनी असलेल्या 5Paisa ने 385 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. Stock Tips

Mahindra & Mahindra signs EV partnership with Volkswagen Group – EQ Mag Pro – The Leading Solar Magazine In India

महिंद्रा अँड महिंद्रा

या कंपनीला SUV आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या जागेत चालणाऱ्या कॅपेक्सचा फायदा होईल असे मत ब्रोकरेज कंपनी 5Paisa ने व्यक्त केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या प्लॅटफॉर्मसाठी कंपनीकडून 9 ते 10 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. 20 ऑक्टोबर रोजी 1,237.55 रुपयांवर ट्रेड असलेल्या या शेअर्सला 5Paisa ने 1,475 रुपयांची टार्गेट प्राईस ठेवली आहे. Stock Tips

Axis Bank To Acquire Over 5% Stake In CredAble For Rs 55 Crore

अ‍ॅक्सिस बँक

ब्रोकरेज हाऊस कोटक सिक्युरिटीजने अ‍ॅक्सिस बँकेच्या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. कोटक सिक्युरिटीजने यासाठी 960 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. तसेच ICICI डायरेक्टने यासाठी 970 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते, सिटी बँकेच्या कंझ्युमर बिझनेस ताब्यात घेतल्याने अ‍ॅक्सिस बँकेला मोठा फायदा होईल. 20 ऑक्टोबर रोजी हे शेअर्स 1.6 टक्क्यांनी घसरून 820.20 रुपयांवर ट्रेड करत होते. Stock Tips

CAMS IPO: Open for a subscription today; know it in detail

CAMS

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीच्या यासाठी 3,300 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या व्यवसायात CAMS ची 70 टक्के भागीदारी आहे. कंपनीने अलीकडेच अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (AIFs) आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) मधील आपले ऑपरेशन्स वाढवले आहेत, ज्यामुळे कंपनीला आणखी फायदा होईल. 20 ऑक्टोबर रोजी हे शेअर्स 1.23 टक्क्यांनी घसरून 2,533.55 रुपयांवर ट्रेड करत होते.Stock Tips

Greenply Industries kicked-off its breakthrough 'ASK GREENPLY' campaign - Exchange4media

ग्रीन प्लाय इंडस्ट्रीज

यश सिक्युरिटीजच्या विश्लेषकांच्या मते, अ‍ॅसेट लाइट बिझनेस आणि कंपनीवरील अत्यंत कमी कर्जामुळे ग्रीन प्लाय पुढील दिवाळीपर्यंत चांगले रिटर्न्स देऊ शकतात. यश सिक्युरिटीजने यासाठी 220 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. भारतातील पायाभूत क्षेत्रात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचाही फायदा कंपनीला मिळू शकतो. 20 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांनी वाढून 180.15 रुपयांवर ट्रेड करत होते. Stock Tips

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.greenply.com/

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर