नागपुरात विचित्र अपघात! बोलेरोची रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. नागपूरच्या पंचशील चौकाजवळ हा अपघात (accident) घडला आहे. यामध्ये एका भरधाव आलेल्या बोलेरो गाडीने उभ्या कारला धडक दिली. त्यानंतर ती कार फुटपाथवर चढली आणि त्या ठिकाणी उभ्या असलेल्या बाईकला धडकली. या अपघातात एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामध्ये (accident) दुकानासमोर असलेल्या वस्तूंचंसुद्धा नुकसान झाले. हि संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बोलोरो गाडीचा ब्रेक फेल झाला होता कि कार चालकाची चुकी होती याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत. सुदैवाने या अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नेमके काय झाले ?
नागपूरच्या पंचशील चौकात नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ सुरु होती. यादरम्यान अचानक एक बोलेरो कार आली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले तिने रस्त्याच्या कडेला असलेल्या कारला धडक (accident) दिली. त्यानंतर फुटपाथवर ठेवलेल्या दुचाकी व सायकलवरून गेली. यामुळं दुचाक्या पडल्या. सायकल चेपकली. यात कार, दुचाकी आणि सायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटना सीसीटीव्हीत कैद
हा अपघात (accident) नेमका कशामुळे झाला याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत. हि अपघाताची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातातून एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment