चंदेरी दुनिया । बॉलिवूड स्टार वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही स्टारर स्ट्रीट डान्सर 3 डी रिलीज होण्यासाठी तयार आहे. हा सिनेमा भरतीय सिनेमातील सर्वात मोठा 3 डी डान्स सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. 24 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 17 डिसेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर लाँच होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाशी संबंधित पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले जात आहेत. चाहत्यांचाही या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वरुण, श्रद्धा आणि प्रभू देवा यांच्यानंतर आता आज नोरा फतेहीचाही पोस्टर समोर आला आहे. पोस्टर शेअर करताना नोरा म्हणाली, ‘It’s time to put your best move forward! The battle is about to begin.’ पोस्टरमध्ये नोरा पूर्णपणे डान्सच्या लुकमध्ये दिसत आहे.