पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नियम मोडणाऱ्यांची गय करायची नाही, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला आहे.

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत मर्यादित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, सोशल डिस्टन्स पाळण्यावर कटाक्ष देण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवीन सरासरी हजारच्या घरात रुग्ण सापडत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच संख्याही मोठी आहे. त्याचवेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार जोरात सुरू आहे. दौंड, सासवड या शहरांतील कोरोनाचा वेग चिंताजनक आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात येत्या सोमवारपासून (ता. 13) लॉकडाउन करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

कोरोनाचा वेग जास्तीचा असला तरी नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला जात आहे. रस्त्यावरही गर्दी वाढत आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर कोरोनाचा प्रसार वाढत येत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सरकारच्या निर्देशानुसार कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. ‘कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.

पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतीच

पुणे जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंतच्या बारा तासात 183 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 979 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने 15 हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत 15 हजार 579 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 8 हजार 809 रुग्णांपैकी 402 रुग्ण गंभीर असून यातील 75 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 327 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment