सातारा जिल्ह्यात 17 जुलै ते 21 जुलै कडक लाॅकडाऊन? Viral मेसेज मागील सत्य जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात बुधवारी दि. 14 जुलै रोजी एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमध्ये सातार्‍यात 17 जुलै ते 21 जुलै कडक लाॅकडाऊन लागणार असल्याचे म्हटले आहे. तसेच लोकांनी दोन दिवसात किराणा व जीवनावश्यक वस्तूंचा साठा करावा असे मेसेजमध्ये म्हटले आहे. सदरचा मेसेज सोशल मिडियावर खूप व्हायरल झालेला आहे. याबाबत प्रशासनातील व्यक्तींनी या बाबत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. अद्याप त्यामध्ये घट होताना दिसत नाही. जिल्ह्यात सर्वात जास्त कराड तालुक्यात कोरोना बाधित आढळत असून त्यामुळे सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावण्याची गरज काही नागरिकांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच सांगली जिल्ह्यात 14 जुलै पासून 19 जुलै पर्यंत लाॅंकडाऊनचे निर्बंध कडक केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान कडक लाॅकडाऊन लागणार असल्याचा मेसेज फिरत आहे.

या Viral मेसेज मागील सत्य काय आहे. तर सातारा जिल्ह्यातील लाॅकडाऊनबाबत सोशल मिडियावर फिरणारा हा मेसेज पूर्णपणे फेक (खोटा) आहे. जिल्हा प्रशासनाने असा कोणताही आदेश सातारा जिल्ह्यात दिलेला नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात 17 ते 21 जुलै दरम्यान सध्या असलेल्या लाॅकडाऊनच्या आदेशात बदल केलेला नाही. तसेच कडक लाॅकडाऊनही लागू केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या सोशल मिडियावर फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये.

आज कोणताही निर्णय नाही

गेल्यावर्षीचा एक व्हिडीओ समाज माध्यमात फिरतो आहे. आज कोणताही व्हिडीओ जिल्हा माहिती कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांनी प्रसारीत केला नाही. आणि आज कोणताही निर्णय झाला नाही. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, सातारा यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment