संप सुरूच : कराड- स्वारगेट बससेवा सुरू, प्रवाशांच्यातून समाधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महिनाभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून जिल्ह्यातील अनेक आगारातून बससेवा सुरू होवू लागली आहे. कराड आगारातही आज एक चालक आणि वाहक हजर झाल्याने संप सुरू असताना पहिली फेरी कराड-स्वारगेट रवाना झाली. त्यामुळे प्रवाशांच्यात समाधानाचे वातावरण दिसून आले.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी संप पुकारला आहे. गेल्या महिनाभरापासून मुंबईतील आझाद मैदानासह राज्यातील विविध आगारात हा संप सुरू आहे. या संपात सुरुवातीला चालक, वाहकांसह सर्वच प्रशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे सर्व एसटी बस जागेवरच उभ्या होत्या. या काळात एसटी कर्मचारी यांची समिती आणि मंत्र्याच्यात अनेक बैठका झाल्या. यामध्ये काही गोष्टीत सकारत्मकता झाल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप सोडून कामावर हजर राहण्याची विनंती केली होती.

यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने 41 टक्के पगारवाढ आली. मात्र, कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले आहे. यावेळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतली. मात्र कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरणाचा लढा सुरूच ठेवला आहे. अशातच राज्यातील अनेक बस आगारातून बससेवा सुरू होत आहे. त्याचप्रकारे शनिवारी दि. 27 रोजी आज कराड आगारात एक चालक आणि वाहक हजर झाल्याने कराड-स्वारगेट ही पहिली बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Comment