कडक सलाम ! भारतीय जवानांकडून एकात्मतेचा फोटो वायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे. या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहत आहेत. एकजुटीचे आणि एकात्मतेचे उदाहरण म्हणून भारताकडे सर्व देश वेगळ्या नजरेने पाहत आहेत. एक चांगला आदर्श भारताने जगाला घालून दिला आहे. भारत देशाचे प्रतीक असलेले राष्ट्रध्वजामध्ये चार रंगाचा समावेश केला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या निशाणीचा समावेश आहे. जवानांकडून वायरल झालेल्या या फोटो मध्ये एक सैनिक नमाज पठण करत आहे. तर दुसऱ्या बाजूला एक सैनिक देव्हाऱ्याजवळ बसून पोथी वाचत असताना दिसत आहे.

या वायरल झालेल्या फोटो मध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होत आहे. एकाच छताखाली दोन वेगवगळ्या धर्मातील लोकांचा या फोटो मध्ये समावेश आहे. या फोटोला अनेक जणींनी प्रतिसाद दिला आहे. अनेक यूजर नि मिळून या फोटोला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने अनेक जणांची मने जिंकली आहेत. अझ्झय या यूजर ने शेअर केला आहे.

एका जवानाने या फोटो ला शेअर करत छान ओळ त्याखाली लिहली आहे. त्यामध्ये लिहले आहे कि, धर्म कोणताही असो विश्वास मात्र एकच आहे. माझ्या युनिटमध्ये १५ टक्के मुस्लिम बांधव आहेत. पण कोणतेही शुभ काम करताना नमाज, पोथी वाचणे किंवा पूजा केली जाते. एकाच ठिकाणी दोन्ही धर्म आपले काम करतात. याच स्थळाला आम्ही सर्व धर्म स्थळ म्हणतो. हा फोटो समानतेची शिकवण देणारा आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

You might also like