औरंगाबाद | आई वडिलांच्या विरोधात जाऊन पाऊल उचलले त्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले.ही गोष्ट मनाला लागल्याने सिल्लोड तालुक्यातील 26 वर्षीय तरुणाने भोकरदन तालुक्यात मावशीच्या गावी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली.तरुणाने आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्ह करीत आई- वडिलांची माफी मागितली.
सुमित किशोर पारधे वय – 26 (रा.हट्टी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सुमितचे एम.एस.सी.चे शिक्षण पूर्ण झाले होते.तो उत्कृष्ट व्हॉलीबॉल पट्टू होता. दोन दिवसांपूर्वी तो जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे मावशीच्या गावी गेला होता. तेथे त्याने गायरान शिवारातील जंगलात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून एक फेसबुक लाईव्ह केले त्या मध्ये त्याने.दोन दिवसांपूर्वी जे काही घडलं त्या वरून मी मरतो आहे. मी आई- वडिलांच्या विरोधात जाऊन पाऊल उचलले आहे. ज्यांच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाही.त्या माझ्या आई- वडिलांना माझ्यामुळे लोकांच्या पाया पडाव्या लागल्या. मी त्यांच समाजात नाव ठेवले नाही. असे म्हणत सुमितने आत्महत्येपूर्वी लाईव्ह केले.
त्यानंतर तो शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसला.पोलिसांनी तातडीने घटनस्थळी पोहोचत त्याला फासवरून खाली काढले मात्र तो पर्यंत त्याची प्राण ज्योत मालवली होती.या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी प्रदीप सरडे यांनी दिली आहे.