विदर्भातील विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण होईपर्यंत मिळणार शिष्यवृत्ती; आजच करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्तीच्या योजना आणल्या जातात. मात्र अशा योजनांपासून विदर्भातील विद्यार्थी वंचित असल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळ इंडिया फाउंडेशन’ विदर्भातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना आखण्यात आली आहे. नारायण आणि सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विदर्भातील एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.

दरवर्षी बनसोडे कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून दोन शिष्यवृत्त्या देण्यात येतात. याच शिष्यवृत्तीच्या अंतर्गत प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांना 12 हजार रुपयांची पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना 2017-18 सालामध्ये सुरू करण्यात आली आहे. यावर्षीही शिष्यवृत्ती विदर्भातील दोन विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील दोन विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींशिवाय पदवीपर्यंत शिक्षण घेता येईल.

कोणाला अर्ज करता येईल

या शिष्यवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी त्याचबरोबर, बारावीच्या परीक्षेमध्ये 85 पेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुविशारद, नर्सिंग, विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

कसा अर्ज करावा

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल न चुकता आवर्जून टाकावे. यासोबत बारावीचे गुणपत्रिका पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्याची झेरॉक्स जोडावी. या अर्जासाठीची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत असेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

सकाळ इंडिया फाउंडेशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२. दूरध्वनी क्रमांक : ०२० – ६६०३५९३५ – ई-मेल [email protected] किंवा [email protected]