हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाही ला कंटाळून मी पक्ष सोडत आहे असे त्यांनी म्हंटल.
मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाही ला कंटाळून मी पक्ष सोडत आहे. मात्र माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोणत्याही प्रकारचा राग नाही. मी शिवसेनेवर नाराज देखील नाही. अशोक चव्हाण नांदेड मध्ये शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला.
कोण आहेत सुभाष साबणे?
सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.